मुंबईत इमारत कोसळून ११ जण मृत्यूमुखी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अब्दुल हमिद रोड मालवणी गेट नंबर ८ येथे एक मजल्याची चाळ कोसळून ११ जणांवर मृत्यू ओढावला आहे. या भीषण ८ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू आहे. पोलीस व रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहचलीआहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

अधिक वाचा : मुंबईत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे निर्देश

प्लॉट नंबर ७२ न्यू कलेक्टर कंपाउंड मालवण येथे काल (ता.१०) रात्री सव्वा अकराच्या सुमारास एक मजल्यांची चाळ कोसळल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यानंतर  युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १७ जणांना वाचवलं आहे. 

अधिक वाचा : ऑनलाईन परीक्षा देऊन घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन्स!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news