Abortion | धक्कादायक : १२ वर्षाच्या मुलीचे अल्पवयीन भावासोबत संबंध; न्यायालयाने गर्भपाताची याचिका फेटाळली
पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन भावाने त्याच्या १२ वर्षांच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याने ही मुलगी गरोदर राहिली आहे; पण गर्भ ३४ आठवड्यांचा असल्याने केरळ उच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली. हा गर्भ ३४ आठवड्यांचा असून तो पूर्ण विकसित आहे, त्यामुळे गर्भपाताची परवानगी देता येणार नाही, असे न्यायमूर्ती देवेन रामचंद्रन यांनी म्हटले आहे. (Abortion)
संबंधित पालकांनी मंजेरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नियमित सहकार्य घ्यावे आणि गर्भ ३६ आठवड्यांचा झाल्यानंतर बाळंतपणाबद्दल मार्गदर्शन घ्यावे, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. तसेच या सर्व प्रकरणात याचिकाकर्त्याची गोपनीयता अबाधित ठेवावी आणि संबंधित भावाने बहिणीशी कोणताही संपर्क ठेऊ नये, असे ही निकालपत्रात म्हटले आहे, असे बार अँड बेंच या वेबसाईटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. (Abortion)
या प्रकरणात न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली होती. १२ वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म देणे तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही, असे या याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने यावर वैद्यकीय बोर्डची स्थापना करण्याची सूचना दिली. सुरुवातीला या बोर्डने गर्भपात करावा, असे म्हटले होते; पण पुनरिक्षणानंतर सिझेरियन पद्धतीने बाळंतपण करावे, अशी सूचना केली. त्यानंतर न्यायालयाने डॉक्टरांशी चर्चा करून ही याचिका फेटाळली.
हेही वाचा
- 26-Week Pregnancy Case | 'गर्भाच्या हृदयाचे धडकणे थांबवू शकत नाही', २६ आठवड्यांच्या गर्भपातास सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली
- आर्थिक, मानसिक स्थिती बिघडलेली; सुप्रीम कोर्टाने दिली विवाहितेला गर्भपातास परवानगी
- Termination of 26-week pregnancy | 'ती' २६ आठवड्यांचा गर्भपात करु शकते का? SC ने AIIMS कडे मागितला अहवाल

