

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) जन्मस्थानावरून भारतात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे खासदार अब्दुल खालिक यांनी मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचे सांगत अकलेचे तारे तोडले आहेत.
अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर फिफा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने रोमहर्षक लढतीत फ्रान्सचा पराभव केला. तेव्हापासून अर्जेंटिना आणि त्याचा कर्णधार लिओनेल मेस्सी यांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. अर्जेंटिनाच्या विजयाचा भारताच्या अनेक भागात जल्लोष करण्यात आला. (Lionel Messi)
मेस्सीचे चाहते जगभरात आहेत. भारतातही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. भारतीय चाहतेही मेस्सीचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, आसाममधील एका काँग्रेस खासदाराला मेस्सीचे भारत कनेक्शन सापडले आहे. मात्र, मेस्सीचा भारताशी संबंध जोडणे काँग्रेस खासदाराला महागात पडले आहे. सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. (Lionel Messi)
ट्विटरवर मेस्सीचे अभिनंदन करताना आसाम काँग्रेसचे खासदार अब्दुल खालिक यांनी लिहिले की, ' मेस्सी तुमचे मनापासून अभिनंदन, तुमच्या आसाम कनेक्शनचा आम्हाला अभिमान आहे.' (Lionel Messi)
अब्दुल खालिक यांच्या ट्विटवर जेव्हा एका युजर्सने मेस्सीच्या आसाम कनेक्शनबद्दल विचारले तेव्हा खासदार साहेबांनी दावा केला की, 'अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा जन्म भारताच्या आसाम राज्यात झाला आहे.' त्याच्या या ट्विटनंतर यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.
काँग्रेस खासदाराने स्वत:ला ट्रोल होत असल्याचे पाहून आपले वादग्रस्त ट्विट डिलीट केले. मात्र त्यांना आपली चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. युजर्सनी खालीक यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट घेतले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
याआधी तृणमूल काँग्रेसचे नेते रिजू दत्ता यांनी मेस्सीच्या बंगाल कनेक्शन शोध लावला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "हा विजय अर्जेंटिनाचा नसून तृणमूल काँग्रेसचा आहे. जय बांगला."
अधिक वाचा :