Cold Water Bath Benefits : हिवाळ्यातही थंड पाण्याची आंघोळ केल्‍यास हाेतील ‘हे’ फायदे

Cold Water Bath Benefits
Cold Water Bath Benefits
Published on
Updated on

नवी दिल्ली : 'ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए' असे एक जुने गाणे आहे. Cold Water Bath Benefits उन्हाळ्यात अनेक लोक थंड पाण्यानेच आंघोळ करत असतात, मात्र हिवाळ्यातही अशी आंघोळ आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे केवळ स्नायूंच्या तणावापासून मुक्त करत नाही तर रक्त परिसंचरण सुधारते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. थंड पाण्याने आंघोळ केली तर शरीरातील पांढर्‍या रक्त पेशींची संख्या वाढते आणि चयापचय गतीही वाढते. वास्तविक, जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता तेव्हा शरीर स्वतःला गरम करण्याचा प्रयत्न करते आणि या प्रक्रियेत पांढर्‍या रक्त पेशी बाहेर पडतात, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि मूड सुधारतो.

जेव्हा आपण थंड पाण्याने आंघोळ Cold Water Bath Benefits  करतो तेव्हा आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोहोचते. ज्यामुळे आपण उबदार राहू शकतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्यास रक्तवाहिन्या मजबूत राहतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. या मार्गाने निरोगी राहण्यास मदत होते. थंड पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. हे कोल्ड कॉम्प्रेशनसारखे कार्य करते. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे त्वचेवर जळजळ होण्यासह पुरळ उठू शकते.

याशिवाय केसांमध्ये कोंड्याची समस्याही असते. दुसरीकडे, जर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली Cold Water Bath Benefits तर त्याचा तुमच्या त्वचेला आणि केसांना फायदा होतो. अर्थात प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्याने याबाबतही तारतम्य बाळगावे लागते. जर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. कारण तुम्हाला सर्दी, खोकला, न्यूमोनिया, घशाची जळजळ आणि ताप यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय तुम्ही हृदयविकाराचे किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर थंड पाण्याने आंघोळ करणे टाळा. कारण असे केल्याने तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news