मागील वर्षी एकनाथ शिंदेंना मिळाल्या होत्या ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शुभेच्छा : वाढदिवसानंतर त्‍या पोस्टरची होतेय चर्चा

 CM Eknath Shinde birthday
CM Eknath Shinde birthday
Published on
Updated on

 पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. शिवसेना कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, असा त्‍यांचा थक्‍क करणारा प्रवास आहे. आज त्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्त मागील वर्षीच्‍या एका पोस्‍टरची चर्चा होतीय. या पोस्‍टरच्‍या माध्‍यमातून एकनाथ शिंदे यांना 'भावी मुख्यमंत्री' अशा शुभेच्छा मिळाल्या होत्या. त्यानंतर हे बॅनर सोशल मिडियावर व्हायरलं झालं होतं.  आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आजच्या वाढदिवसाला हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतं आहे. ( CM Eknath Shinde birthday )

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं बॅनर.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं बॅनर.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील दिग्‍गज नेते. त्‍यांनी जून २०२२ मध्‍ये घेतलेल्‍या निर्णयामुळे राज्‍यातील राजकारण नाट्यमयरित्या बदलत गेले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले;पण तुम्‍हाला माहिती आहे का,  मुख्‍यमंत्री होण्‍यापूर्वी ४ महिने आधीच एकनाथ शिंदे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा मिळाल्या होत्या. 

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महाविकासआघाडी होताना एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा 'मुख्यमंत्री'पदासाठूी होत होती; पण हे पद उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले.  ज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री, ठाणे आणि गडचिरोली जिल्हा पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले.

 CM Eknath Shinde birthday :'भावी मुख्यमंत्री'

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्‍या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले होते. ठाण्यामध्येही ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर दिसत होती; पण त्यामधील एक बॅनर खूप चर्चेत होते. ते म्हणजे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून दिलेल्या शुभेच्छांचे. या शुभेच्छा वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी दिल्या होत्या. हे बॅनर ठाण्यातील चेकनाका इथे लावले होते. या बॅनरवर एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासह यादव यांचाही फोटो होता. या शुभेच्छानंतर या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली तसचं ते बॅनर सोशल मीडियावरही व्हायरलं झालं होत. 

राजकीय वर्तूळात चर्चा

शिवसेनेतील बंडानंतर  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.आज त्यांचा वाढदिवसानिमित्त या पोस्टरची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर होवू लागली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news