

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमास विरोधातील हवाई कारवाईनंतर इस्रायल जमिनीवर लष्करी कारवाई सुरू करणार आहे. यासाठी उत्तर गाझातील ११ लाख पॅलिस्टिनी नागरिकांना निघून जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पण इस्रायलने दिलेली वेळ फार कमी असून यातून फार मोठे मानवी संकट निर्माण होईल, असा भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान इस्रायलच्या या इशाऱ्यानंतर पॅलेस्टाईनमधील नागरिक दक्षिण गाझाकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. तर दुसरीकडे हमासने नागरिकांनी घरातच राहावे अशा सूचना केल्या आहेत. (Israel Hamas War)
इस्रालईच्या हल्ल्यांत गाझातील १५०० लोकांचा आतापर्यत मृत्यू झाला असून ४ लाखावर लोक बेघर झालेले आहेत, असेही सीएनएनने म्हटले आहे.
बीबीसीने या संदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे. इस्रायलने जो भाग खाली करण्यासाठी सांगितला आहे, तो गाझाच्या ३० टक्के आहे. गाझा शहर, आणि बीच, जाबालया हे निर्वासित कँप या भागात आहेत. याशिवाय दोन लहान शहरीही या भागात आहेत. म्हणजेच गाझाचा सर्वाधिक लोकसंख्येचा हा भाग आहे. येथून दक्षिणकडे जाण्याची फक्त एकच रस्ता आहे, त्यामुळे या एकाच मार्गावरून फक्त चोवीस तासांता ११ लाख लोक सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले तर फार मोठा गोंधळ निर्माण होणार आहे, असे बीबीसीने म्हटले आहे.
गाझामधील मानवतेच्या नात्याने सुरू असलेली मदत रोखली गेली आणि इस्रायलकडून युद्धगुन्हे सुरूच राहिले तर युद्धात नवी आघाडी उघडली जाईल, असा इशार इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमिर-अब्दोल्लाहिआन यांनी दिला आहे. पण ही आघाडी इराण उघडणार की अन्य कोणी याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. विरोधी चळवळीकडून ही आघाडी उघडली जाईल, असा त्यांनी उल्लेख केला. हमसा, हिजबुल्लाह यांच्या जोडीने सीरिया, इराक आणि येमेनमधील सशस्त्र गटांचा उल्लेख विरोधी चळवळ असा केला जातो.
व्हॅटिकनचे सचिव कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन म्हणाले, "हमसाचा हल्ला हा अमानवी आहे. पण इस्रायलाचा स्वसंरक्षणचा जो कायदेशीर अधिकार आहे, त्यात सामान्य नागरिकांना इजा पोहोचू नये. या संपूर्ण प्रकरणात व्हॅटिकन मध्यस्थी करण्यास तयार आहे." व्हॅटिकनच्या वतीने यापूर्वीही पॅलेस्टाईनशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले होते. १९८७ला पोप जॉन पॉल दुसरे यांनी पॅलेस्टाईनच्या नेत्यांशी चर्चा केली होती. पोप बेनेडिक्ट १६वे आणि पोप फ्रान्सिस यांनी या परिसरला भेटी देऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा