मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

Published on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे स्वागत केले.

खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया हेदेखील त्यावेळी उपस्थित होते. १.३० वाजता मुख्यमंत्री सांगलीला रवाना झाले. दुपारी तीन वाजता ते सांगलीहून कोल्हापुरात येतील. दुपारी तीन ते चार पूरस्थितीचा आढावा घेऊन सायंकाळी 5 वाजता ते मुंबईला रवाना होणार आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news