

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आपल्या मुळ गावी दरे तांब येथे आले असून मंगळवारी सकाळी ते ग्रामस्थ व शासकीय अधिकार्यांना भेटल्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानाभोवती असणार्या शेतीची पाहणी केली. (Chief Minister Eknath Shinde)
शेतीची पाहणी करत असताना आंबा, चिकू, नारळाच्या बागेचाही त्यांनी फेरफटका मारला. प्रत्येक झाडावर आपली नजर फिरवत कुठे झाडाला काही झाले आहे का? या संदर्भातील सर्व माहिती कृषी तज्ज्ञांकडून त्यांनी घेतली. (Chief Minister Eknath Shinde)
यानंतर ना. शिंदे यांनी आपल्या घरातच प्रशासकीय अधिकार्यांबरोबर जनता दरबार भरवला. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर विभागातून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या तसेच संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना सूचना देखील केल्या. सातारा जिल्ह्यासाठी विकासात्मक धोरण अधिकार्यांकडून जाणून घेत मंजूर झालेल्या निधीचा तत्काळ विनियोग करावा, अशा सूचनादेखील ना. शिंदे यांनी दिल्या.
यावेळी सातारा जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा :