Mobile Blast : मोबाईलवर व्हिडिओ चालू असताना स्फोट; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू | पुढारी

Mobile Blast : मोबाईलवर व्हिडिओ चालू असताना स्फोट; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना तिच्या हातातच मोबाईलचा स्फोट झाला. सोमवारी (दि. २५) रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आदित्यश्री असून ती इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. थ्रिसूर जिल्ह्यातील तिरुविलामाला येथे ती राहत होती. पझायनूर ब्लॉक पंचायतीचे माजी सदस्य अशोक कुमार आणि सौम्या यांची ती मुलगी होती. तीन वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या सेकंड-हँड फोनवर आदित्यश्री व्हिडिओ पाहत होती. यावेळी अचानकपणे तिच्या हातातील मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) झाला. या दुर्घटेनत तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेनंतर लगेचच तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अपयश आले आणि आदित्यश्री हिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पऱ्हान्नूर पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने या प्रकरणाचा अधिक तपास घेण्यास सुरू केला आहे.

हेही वाचा

Back to top button