माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या गीतिका कौलने जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास रचला आहे. सियाचीन बॅटल स्कूलमधील खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर गीतिकाने हे महत्त्वाचे यश संपादन केले आहे.कॅप्टन गीतिकाची छायाचित्रे शेअर करताना, भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सांगितले की, तिची उल्लेखनीय समर्पण, क्षमता आणि अडथळे तोडण्याची आणि राष्ट्रसेवेत उत्कृष्टता मिळविण्याची भावना इतरांना प्रेरणा देण्यासाठी एक उदाहरण आहे.