BYJU’S lays off : ‘बायज्यू’ने पुन्हा १००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

BYJU’S lays off : ‘बायज्यू’ने पुन्हा १००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'BYJU'S ने कर्मचारी कपात करण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. ऑक्टोंबरमध्ये कंपनीने मोठी कर्मचारी कपात केल्यानंतर आता पुन्हा त्यांनी १५ टक्के लोकांना कामावरुन कमी केले आहे. ही १५ टक्के कपात म्हणजे जवळजवळ १००० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले आहे. या मधील सर्वाधिक कर्मचारी हे इंजिनिअरिंग विभागातील आहेत. (BYJU'S lays off)

सध्या जगभरात मंदीचे सावट असून मोठ मोठी आयटी व इतर कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. गुगल, ट्वीटर या सह जागतिक मोठ्या आयटी कंपन्यासह भारतातील इतर कंपन्यांनी देखील कर्मचारी कपात करण्याचा धडका लावला आहे. आता भारतात ऑनलाईन व ॲपच्या माध्यामतून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'BYJU'S या कपंनीने कर्मचारी कपातीचे धोरण अत्यंत आक्रमकपणे राबविले आहे. (BYJU'S lays off)

व्हॉटस्अप कॉलद्वारे कर्मचाऱ्यांना दिला निरोप (BYJU'S lays off)

कंपनीने फ्रेशर्सनासुद्धा कमी करण्यात आले आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली हे त्यांना ईमेलद्वारे न कळवता, व्हॉटस्अप कॉलद्वारे कामावरुन कमी करण्यात आल्याची सुचना देण्यात आली. या पद्धतीचा वापर केल्यामुळे कार्पोरेट जगतात आश्चर्याचे आणि संतापाचे वातावरण आहे.

२५०० हजार कर्मचारी कपात करण्याचे टार्गेट

कंपनीने त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के म्हणजे जवळपास २५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यापद्धतीने सातत्याने त्यांच्याकडून कर्मचारी कपात करण्याचा धडका सध्या सुरु आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news