British rocket launch from aircraft : विमानातून होणार ब्रिटिश रॉकेटचे प्रक्षेपण

British rocket launch from aircraft
British rocket launch from aircraft
Published on
Updated on

लंडन : ब्रिटनमध्ये आता एका विमानातून रॉकेटचे प्रक्षेपण (British rocket launch from aircraft) केले जाणार असून हे रॉकेट सॅटेलाईटस् म्हणजेच कृत्रिम उपग्रहांना सोबत घेऊन अंतराळात जाईल. एका पुनर्विकसित प्रवासी विमानाच्या सहाय्याने हे प्रक्षेपण केले जाणार आहे. या मोहिमेत अनेक छोटे उपग्रह अंतराळात सोडले जातील. सर रिचर्ड ब्रान्सन यांच्या 'व्हर्जिन ऑर्बिट' कंपनीसाठी हे पहिले आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण असेल. या कंपनीने अमेरिकेत अशा प्रकारची चार प्रक्षेपण केली आहेत. ब्रिटनसाठी अशा प्रकारचे पहिलेच उपग्रह प्रक्षेपण असून ते ब्रिटनमधूनच होत आहे हे विशेष!

या मोहिमेत 'व्हर्जिन अटलांटिक बोईंग 747' या पुनर्विकसित विमानाचा वापर केला जाईल. या विमानासोबत एक रॉकेट कॉर्नवॉलमधून रवाना केले जाईल. (British rocket launch from aircraft) उड्डाणाच्या एका तासानंतर ज्यावेळी विमान अटलांटिक महासागरावर 35 हजार फूट उंचीवर असेल त्यावेळी हे विमान रॉकेट अंतराळात सोडेल. त्यानंतर हे रॉकेट अनेक छोटे उपग्रह घेऊन अंतराळातील निर्धारित कक्षेत जाईल.

या क्रियेनंतर विमान कॉर्नवॉलमध्ये (British rocket launch from aircraft)  परत येईल. 'व्हर्जिन ऑर्बिट'ने म्हटले आहे की, हे विमानातून पश्चिम युरोपमधील पहिले व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण असेल. यापूर्वी ब्रिटनमध्ये बनलेल्या उपग्रहांना अंतराळात पाठवण्यासाठी अन्य देशांच्या प्रक्षेपण केंद्रांची मदत घेतली जात होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news