Britain’s Prime Minister Race : ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांची उमेदवारीची घोषणा
पुढारी ऑनलाईन डेस्क : लिज ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर इंग्लंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय वंशाचे नेते आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी रविवारी (दि.२३) इंग्लंडच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारीची घोषणा केली आहे. यावेळी इंग्लंडची अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचे ते म्हणाले आहेत. (Britain's Prime Minister Race)
ऋषी सुनक याबाबत ट्वीट करताना म्हणाले की, इंग्लंड एक महान देश आहे. पण आपल्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. त्यामुळे मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलो आहे. मी आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी आपल्या देशासाठी काम करू इच्छितो. यावेळी सुनक यांनी अर्थमंत्री असताना केलेल्या कामांचाही उल्लेख केला. (Britain's Prime Minister Race)
४२ वर्षीय सुनक हे संसदेतील १२८ टोरी सदस्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर कंजर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाच्या शर्यतीत अग्रेसर मानले जात आहेत. तर माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या समर्थकांनी दावा केला आहे की, कंजर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदासाठी आवश्यक असणारे संख्या बळ आमच्याकडे आहे. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. पंतप्रधानपदासाठी तीन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामध्ये ऋषी सुनक, बोरिस जॉन्सन आणि पेनी माँपडॉन्ट यांचा समावेश आहे. (Britain's Prime Minister Race)
हेही वाचलंत का?
- Rohit Sharma Emotional : पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा भावूक, राष्ट्रगीत गाताना अश्रू अनावर! (Video)
- Bombay HighCourt : अखेर 9 वर्षाच्या मुलावरील गुन्हा रद्द! न्यायालयाने पोलिसांवर ओढले ताशेरे, 25 हजारच्या भरपाईचे आदेश
- Noida Couple Filming In OYO : हॉटेलमध्ये जोडप्यांच्या 'त्या' क्षणांचे चित्रीकरण, टोळीचा पर्दाफाश

