

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रायलाने ७ कमोडिटीजच्या फ्युचर ट्रेडिंग्जना स्थगिती दिली आहे. या ७ कमोडिटिजमध्ये तांदूळ (बासमती व्यतिरिक्त), गहू, चना, मोहरी, सोयबीन, कच्चे पामतेल आणि मूग यांचा समावेश आहे.
या आदेशाची अंमलबजावणी तातडीने होणार आहे. सेबीने दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे की, या कमोडिटजमध्ये नवीन काँन्ट्रॅक्ट घेता येणार नाहीत. जे काँन्ट्रक्ट सध्याचे आहेत, त्यात फक्त स्केअर ऑफ करता येईल. केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण मिळणवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या निर्णय घेण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्यात Consumer Price Inflation हा ४.९१ टक्के इतका होता. तर Wholesale Inflation नोव्हेंबर महिन्यात १४.२३ टक्का इतका राहिलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने करात विविध सवलती देण्यात आल्या आहेत, पण तरीही महागाईवर फारसे नियंत्रण आणता आलेले नाही.
हे वाचलंत का?