

पुढारी ऑनलाईन डेस्क :
दोघे जण मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिप होते.दोघांनी नात्याला अधिकृत रुप देण्याचं ठरवलं. लग्नाची तारीखही ठरली. प्रेयसी रजिस्टर ऑफिसमध्ये नवरदेवाची वाट पाहत बसली;पण तो आलाच नाही. तिने थेट पोलीस स्टेशन गाठत आपल्या प्रियकराविरोधात तक्रार दिली. हा प्रकार घडला आहे ओडिशामध्ये आणि आपल्याच लग्नाला जाण्यस विसरलेला नवरदेव आहेत ओडिशातील सत्ताधारी पक्ष बीजू जनता दलाचे आमादर बिजय शंकर दास. आपल्याला लग्नाचे कोणी सांगितलेच नाही, असा खुलासा करत त्यांनी स्वत:चेच हसू करुन घेतले आहे. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार बिजय शंकर दास यांच्या प्रेयसीने दावा केला आहे की, आम्ही दोघे मागील तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. लग्नासंदर्भात दोन्ही कुटुंबामध्ये चर्चाही झाली. लग्न नोंदणी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार १७ मे रोजी विवाहाची तारीखही ठरली. सर्व नातेवाईक जगतसिंहपूर मधील विवाह नोंदणी कार्यालयात पोहचले. त्यांनी नवरदेवाची वाट पाहली. मात्र बराचवेळ झाला तरी तो कार्यालयात पोहचला नाही. त्याच्या मोबाईल फोनवर संपर्क साधण्यात आला. त्याने फोनवर प्रतिसाद दिला नाही.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात आमदार बिजय शंकर दास यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी आपल्यावर आरोप करणार्या तरुणीबरोबर विवाह ठरल्याचे मान्य केले. मात्र मला लग्नाबाबत माहिती नव्हती. तसेच मला लग्नाची तारीखच कोणी कळवली नाही. मी संबधित तरुणीबरोबरच लग्न करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता किमान लग्नाच्या पुढील तारीख तरी बिजर शंकद दास यांनी विसरु नये, अशी अपेक्षा तरुणींच्या नातेवाईकांनी केली आहे.
हेही वाचा