बीटकाॅईन गुन्हयात पाटील, घोडे विरोधात साडेचार हजार पानी दोषारोपत्र दाखल

crime
crime
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घोडे यांच्या विरोधात पुणे आर्थिक गुन्हेशाखेच्या सायबर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात चार हजार ४०० पानी दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात एकूण २५ साक्षीदार यांचे जबाब पोलिसांनी जबाब नोंदविण्यात आले आहे.

पाटीलच्या चौकशीत 6 कोटींची क्रिप्टाे करन्सी जप्त :

पाटील याच्याकडील चौकशीत पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध ३४ प्रकारची सहा काेटी रुपयांची क्रिप्टाे करन्सी जप्त केली आहे. पाटील याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्या नावावर क्रिप्टाे करन्सीचे वाॅलेट काढून त्यात आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन वर्ग केल्याची बाब ही तपासात निष्पन्न झाली आहे.

याप्रकरणी त्याची पत्नी आणि भाऊ यांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहे.

असा आहे पाटीलचा प्रवास :

रविंद्र पाटील याचे अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण झालेले असून ताे सन २००२ बॅचचा केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत उत्तीर्ण हाेऊन त्याला जम्मू-काश्मीर कॅडेर मिळाले हाेते. मात्र, आयपीएसच्या नाेकरीत पाटील याचे मन रमले नाही आणि अल्पावधीत त्याने राजीनामा देऊन खासगी कंपनीत ताे रुजू झाला. आतरराष्ट्रीय स्तरावरील के.पी.एम.जी. या नामांकित कंपनीत ताे ई-डिसकव्हरी, सायबर तज्ञ म्हणून वरिष्ठ पदावर काम करत हाेता. त्याचप्रमाणे चीन मध्ये हाँगकाँग येथेही काही काळ त्याने काम केले.

पुणे पाेलीसांकडे सन २०१७ मध्ये अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचे विराेधात दत्तवाडी व निगडी पाेलीस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकाॅईनच्या गुन्हयात पुणे पाेलीसांनी सायबर तज्ञ म्हणून काम करत हाेता. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना, आराेपींच्या खात्यावरील क्रिप्टाे करन्सी परस्पर इतर खात्यात वळविल्याचे तसेच खात्यावर कमी बीटकाॅईन असल्याचे स्क्रीनशाॅट दाखविल्याचे केवायसीच्या रिपाेर्ट मधून दिसून आले आहे. आतापर्यंत रविंद्र पाटील याने २३६ बीटकाॅईन इतरत्र वळविल्याचे ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. बीटकाॅईन गुन्हयातील पैशातून त्याने वेगवेगळया ठिकाणी गुंतवणुक केल्याचे ही स्पष्ट झाले असून त्याबाबत पाेलीस अधिक चाैकशी करत आहे.

असा आहे गुन्ह्यातील घोडेचा सहभाग :

पंकज घाेडेची परदेशात गुंतवणुक

सदर गुन्हयातील आराेपी पंकज घाेडे हा ग्लाेबल ब्लॅकचेन फाऊंडेशन कंपनी चालवत हाेता. सायबर तज्ञ म्हणून पाेलीसांसाेबत काम करताना त्याने ही आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन इतरत्र वळवून फसवणुक केली आहे. आराेपींच्या खात्यावर बिटकाॅईन शिल्लक असतानाही बिटकाॅईन नसल्याचे स्क्रीनशाॅट त्याने पाेलीसांना दिले असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या क्रिप्टाे करन्सी वाॅलटच्या तपासणीत त्याने हजाराे युराे, डाॅलरचे आर्थिक व्यवहार परदेशात केल्याचे दिसून आले असून याबाबत पाेलीस तपास करत आहे. सिंगापूर आणि ब्रिटन मधील त्याचे मित्रांच्या बँक खात्याची ही याबाबत चौकशी करण्यात आली आहे. वेगवेगळया क्रिप्टाे करन्सीत त्याने गुंतवणुक केल्याचा पाेलीसांना संशय आहे.अल्पावधीत काेटयावधी रुपयांच्या सहा वेगवेगळया कंपन्या त्याने सुरु केल्या हाेत्या मात्र त्याचे आयकर विभागाकडे काेणतेही रिर्टन त्याने भरले नसल्याचे उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news