

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपबरोबर काडीमोड घेत जनता दल संयुक्तचे (जेडीयू) नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतेच राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) व अन्य पक्षांबराेबर नवे सरकार स्थापन केले. ( Bihar Politics ) आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार हेच विरोधी पक्षांच्या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर बिहारचे उपमुख्यमंत्री व आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी उत्तर दिले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखती देताना तेजस्वी यादव म्हणाले की, विरोधी पक्षांनी विचार केला तर नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी एक सक्षम उमेदवार असू शकतील. देशभरात नितीशकुमार यांची प्रतिमा खूपच चांगली आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांची दावेदारी असण्याची शक्यता आहे. ( Bihar Politics ) बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी, काँग्रेस व अन्य दलांचे महाआघाडीचे सरकार सत्तेत येणे ही विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठीचा शुभ संकेत आहे. आता सर्व विरोधी पक्ष एकत्रीत येवून भाजपला आव्हान देवू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपकडून काही राज्यांवर अन्याय केला जात आहे. बिहारकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बिहारला केंद्र सरकारकडून कोणाताही अतिरिक्त निधी मिळत नाही. आता राजकीय पक्षांनाही आपल्या फायदा व तोट्यापेक्षा राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्याची गरज आहे. तरच लोकशाहीची जपवणूक होईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :