Bigg Boss Marathi 4 : माणूस हाय मी; बिग बॉस मराठीचे स्पर्धक किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचे  स्पर्धक अभिनेते किरण माने (Bigg Boss Marathi 4) यांची एंट्री झाली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट व्हायरल होत आहे. वाचा ही सविस्तर पोस्ट त्यांच्याच शब्दांत…

माझा इस्वास हाय तुमी माझी साथ सोडनार नाय! मानूस हाय मी, माणसासारखा वागनार तिथं. मनापास्नं. कुठलंच ढोंग नाय करनार. खेळ हाय त्यो. स्विकारलाय तर जीव लावून खेळनार. ढिला पडनार नाय. हसनार, हसवनार, चिडनार, चिडवनार, भांडनार, वाद घालनार, मैत्री केलीच तर 'दिल से' करनार…ती निभावनार. एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडनार….

Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4 : लै शिवराळ हाय

गावाकडचा गडी हाय. शेतकरी कुटुंबातला. रानात फिरलेला, ढेकळं तुडवलेला. नदीत, विहिरीत पोहलेला. एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायचा जिवापाड प्रयत्न करावा लागनारंय दोस्तांनो. 'शिवी' ! 'शिवी' हा आमच्या बोलीतला अविभाज्य भाग हाय. त्या शिव्यांचा अर्थ नस्तो डोक्यात. एक एक्सप्रेशन म्हनून ती बाहेर येती एवढंच. आवो आमी तर लै छोटी मान्सं, आमच्या पहाडासारख्या तुकोबारायाच्या अभंगातबी तुमाला शिव्या सापडत्याल. निव्वळ मनातली भडास व्यक्त करन्याचं साधन म्हनून शिवी येती तोंडात. पन त्याचा तिथं 'इश्यू' हुईल.. माझ्याविरूद्ध शस्त्र म्हनून वापर हुईल, हे म्हायतीय मला. कारन मी बी लै शिवराळ हाय. भांडताना मला त्या सवयीवर लगाम घालायला लागनार. ते करीन.

Bigg Boss Marathi 4 : तुकोबा माझ्या श्वासात

माझ्या भावांनो आनि बहिनींनो, मी तुमचं मनोरंजन करन्यात कनभरबी कमी पडनार नाय. माझ्याकडनं चुका झाल्या तर त्या पोटात घ्याल तुमी हे बी म्हायतीय मला. मला एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय. मी तुकोबारायांवर कायम लिहीत असतो. तुकोबा माझ्या श्वासात हाय. मी गौतम बुद्धांवर व्याख्यान देतो. छ. शिवराय, छ. शंभूराजे यांच्यावर व्याख्यानं देतो. महाराष्ट्रातल्या गांवोगांवी जाऊन महात्मा फुले, लोकराजा शाहू महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करतो. या सगळ्या महामानवांचे विचार माझ्या रक्तात हायेत. पन एक लक्षात ठेवा, सामान्य मानूस ज्या चुका करतो, त्या माझ्याकडनं बी होत्यात. मी आदर्श असल्याचा मुखवटा घालून नाय खेळनार. अभिनेता, सेलिब्रिटी म्हनून 'बिग बाॅस'सारख्या शो मध्ये जाताना मी केवळ एक त्या शो चा खेळाडू म्हनून खेळीन. "बाहेर व्याख्यानांत महामानवांवर बोलतो आणि शो मध्ये बघा कसा भांडतोय." असा गोंधळ करून घेऊ नका. मी बिग बाॅसच्या घरात केवळ या शो च्या 'फाॅरमॅट'चं पालन करून खेळनारा एक खेळाडू असेन. खेळाडू, एक अभिनेता म्हनूनच माझ्याकडं बघा आणि शोचा आनंद घ्या.
मी ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, वारकरी कुटुंबातला हाय. संवेदनशील, विवेकी विचारांचा शहरी वर्गही माझ्या लै जवळचा हाय. तिथं मी जेवढे दिवस असेन तेवढे दिवस तुम्ही सगळ्यांनी माझ्या 'परफाॅर्मन्स'चा आनंद घ्यावा, तुमचा रोजचा एक तास माझ्यामुळं सुखकर व्हावा ही माझी इच्छा हाय.
Kiran Mane Fb Post
Kiran Mane Fb Post

समस्त बहुजनांचा एक प्रतिनिधी

ही पोस्ट वाचताना तुमाला वाटत आसंल मी तर 'बिग बाॅस'च्या घरात हाय. ही पोस्ट कधी लिहिली? भावांनो, जायच्या आधी मी हे लिहून ठेवलंय. आता माझं फेसबुक आनि इन्स्टा अकाऊंट माझ्या अत्यंत जवळच्या लोकांकडं आसंल. इथून पुढं माझ्या वतीनं ते पोस्टच्या माध्यमातनं तुमच्या संपर्कात रहातील. तुम्हीही काॅमेन्टस् करून वरचेवर तुमचं मत कळवत रहा. मी तिथुन आल्यावर प्रत्येक काॅमेन्ट वाचेन हा शब्द देतो. ट्राॅफी घेऊन यायची इच्छा हाय. जिंकायची लै इच्छा हाय. अर्थात, तुमच्या व्होटिंगवर ते ठरंल. मी कधीच प्रेक्षकांना 'गृहित' धरत नाय. त्यामुळं मी किती दिवस राहिन, ते आत्ता तरी म्हाईत नाय. पन जेवढे दिवस राहीन तेवढे दिवस तुमची साथ, तुमचं प्रेम माझ्यासोबत राहूद्यात. आता मी एकटा नाय, समस्त बहुजनांचा एक प्रतिनिधी हाय. कायबी झालं तरी माझ्यावर माया करनार्‍या मातीचं मी लेकरू हाय. याची जानीव सतत मनात आसंल ही खात्री बाळगा.

जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम !

– किरण माने.

'मुलगी झाली हो' – विलास पाटिल

स्टार प्रवाहावरील अल्पावधीचं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली मालिका म्हणजे 'मुलगी झाली हो' (Mulagi Zali Ho). या मालिकेत ते माउचे बाबा म्हणजे विलास पाटिल यांची भूमिका साकारत होते. या मालिकेमधील बाप-मुलीचं अनोख नातं असणार्या त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेली. गावराण, रांगड्या आणि साधा सरळ, मनाचा ठाव घेणारा विलास पाटिल प्रेक्षकांना आपला वाटतो. पण त्यांना या मालिकेतून त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी ते चर्चेत आले होते. 

kiran mane
kiran mane

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news