BBM-4 : मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये-अपूर्वा नेमळेकर भडकली

apurva nemalekar
apurva nemalekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "ALL IS WELL" म्हणत काल बिग बॉस मराठीच्या घराचा दरवाजा उघडला. बिग बॉस मराठीच्या सिझन चौथामध्ये कोण सदस्य असतील? अखेर काल त्या बातम्यांना, चर्चेला पूर्णविराम लागला १६ सदस्यांची काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाली. आजपासून १०० दिवस १६ सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या. आता खरंच सगळं "ALL IS WELL" असेल का हे लवकरच कळणार आहे.

बिग बॉसचे यावर्षीचे अप्रतिम घर सदस्यांना देखील आवडले, घराच्या ते प्रेमातच पडले हे नक्की! प्रत्येक सदस्याला घरात प्रवेश करण्याआधीच त्यांची कामे बिग बॉसने ठरवून दिली. नुकताच एक प्रोमो समोर आला असून सदस्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले.

बिग बॉस यांनी जाहीर केले. प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी हे ठरवायचे आहे की, कोणता खेळाडू निरुपयोगी आहे? त्रिशूलचे म्हणणे पडले किरण माने, तर अपूर्वाने प्रसादचे नावं घेतले, ती असं देखील म्हणाली "मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये". आता बघूया सदस्य कोणत्या खेळाडूला ठरवणार निरुपयोगी?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news