ठाणे : लिव्ह इन रिलेशनशिपमधला वाद ठरतोय जीवघेणा

file photo
file photo
Published on
Updated on

ठाणे;  पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंध, लालच, नशा अशा करणातून हत्यासारखे गंभीर गुन्हे घडतात. मात्र, गेल्या काही वर्षात लिव्ह इन रिलेशनशिप मधला विकोपाला जाणारा वाद देखील जीवघेणा ठरतोय. ठाणे शहर आयुक्तालयात मागील आठ महिन्यात एकूण 55 खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 51 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी उलगडा केलेल्या 51 पैकी 9 गुन्ह्यात लिव्ह इन रिलेशनशिप मधला वाद विकोपाला गेल्याने साथीदारानेच साथीदारास संपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्‍या काही जोडप्यांचा विकोपाला जाणारा वाद जीवावर उठत असल्याचे समोर येत आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाची गाठ न बांधता एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहणे. दोन प्रौढ व्यक्ती लग्न न करताही स्वत…च्या इच्छेने कौटुंबिक-वैवाहिक जीवन जगू शकतात. विधिमंडळ लिव्ह इन रिलेशनशिपलाही वैध मानते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले
आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या 24 वर्षीय तरुणीची तिच्याच साथीदाराने गळा दाबून हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी (28 सप्टेंबर) भिवंडीत घडली होती. हत्या केल्यानंतर रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह गुपचूप गावी विजापूरला नेण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र, भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीलापुण्यातून ताब्यात घेत अटक केली. तसेच
रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर हा वाद एके दिवशी इतका विकोपाला गेला की या वादानंतर तरुणीची हत्या झाल्याची माहिती पोलीस चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. तर या घटनेच्या दोन आठवड्यापूर्वी देखील अशीच एक घटना भिवंडीत समोर आली होती. या दोन्ही घटनांमुळे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्‍या महिला पुरुषांचा वाद जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ठाणे शहर पोलिसांच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट 2022 या आठ महिन्याच्या कालावधीत एकूण 55 खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 51 गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी उलगडा केलेल्या 51 पैकी 9 गुन्ह्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या जोडप्यांला वाद विकोपाला गेल्याने जोडीदारानेच हत्या केल्याचे समोर आले आहे.

हत्येसारखे गंभीर गुन्ह्यांबरोबरच हत्येचा प्रयत्न, जबर मारहाण, फसवणूक आदी देखील प्रकार लिव्ह इनच्या प्रकारातून समोर येत आहेत. अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी अनेक जोडप्यांमध्ये नसते. अनेकदा आपल्या पार्टनरच्या काही सवयी एकमेकांना आवडत नाहीत आणि छोट्यामोठ्या गोष्टीतून वाद होतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की त्यातून गंभीर गुन्हे देखील घडतात असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

अनेक वेळा लिव्ह इन रिलेशनशिप फक्त एक आकर्षण ठरते. रिलेशनमध्ये असल्यावर नवलाईचे नऊ दिवस संपले की एकमेकांचा खरा स्वभाव कळू लागतो. अशावेळी नात्याच्या बंधनातून बाहेर पडण्याची धडपड जोडपे करतात आणि जोडीदारापासून पिच्छा सोडवण्यासाठी देखील हत्येसारखे गंभीर गुन्हे घडतात, असे गुन्हे शाखेच्या एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

शारीरिक संबंध आणि फसवणुकीचे प्रकार

लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर आधार दिला गेला असला तरी या नात्याचा उपयोग अनेकवेळा चुकीच्या कामासाठी केला जातो. ठाण्यातील एका महिला समाजसेविकेच्या म्हणण्यानुसार एकूण 75 ट ?े लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्यात शारीरिक संबंध व फसवणूक हाच मुख्य उद्देश असतो. साहजिकच असे नाते पुढे वादाला कारण ठरते व त्यातून अनेक गंभीर गुन्हे देखील घडतात. अनामिक नात्याच्या या प्रवाहात फक्त महिलाच नव्हे तर अनेक वेळा पुरुष देखील या आभासी नात्याच्या जाळ्यात अडकून गंडवले जातात. सध्या अळंबी
सारख्या उगवलेल्या विवाह जुळवणार्‍या वेबसाईटच्या माध्यमातून हा बाजार जोर पकडत असल्याचे सायबर कायदेतज्ञ प्रशांत माळी यांनी सांगितले. काही विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळांनी लिव्ह इन रिलेशनशीपसाठी नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विवाह बंधनात अडकण्याऐवजी केवळ लिव्ह इनमध्ये राहण्याकडे जास्त पसंती दिली जात आहे.

कायदा काय म्हणतो

2013 आली सुप्रीम कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानुसार, अधिक काळापासून चालत आलेले नाते असे असले पाहिजे की ते टिकून राहतील आणि हे न्यायालय ठरवेल. जर दोघेही पार्टनर दीर्घकाळापासून त्यांचे आर्थिक आणि इतर प्रकारचे व्यवहार आपापसात वाटून घेत असतील, तर या नात्याला लिव्ह-इन म्हटले जाईल असे कायदेशीररित्या जाहीर करण्यात आले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना दोघांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे असे नमूद करण्यात आले आहे. रिलेशनशिपमध्ये असताना मुलाचा जन्म झाला तर ते नाते लिव्ह-इन मानले जाईल.

शारीरिक संबंध आणि मुल होणे हे दोघांच्याही इच्छेवर अवलंबून राहील, असे देखील कायदेशीर तत्वात नमूद आहे. 2 केवळ शारीरिक संबंधासाठी एखाद्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर पुरुष त्या महिलेला सोडू शकत नाही. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण, मालमत्तेचा अधिकार, ब्रेकअप झाल्यास पोटगी, मुलाला वारसा ह ? या महिलांच्या अधिकारांचा त्यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news