पंजाबमध्ये ६६ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ११७ मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लवकरचं लक्ष वेधुन राहीलेल्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये आम आदमाी पार्टीची सत्ता येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Singh Mann) यांनी तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, राज्यात आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेत आल्यास सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो असणार नाही. सर्व सरकारी कार्यालयात शहदी भगतसिंग आणि भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.