कर्नाटक : गोकाकमध्ये लहान भावाचा भोसकून खून

कर्नाटक : गोकाकमध्ये लहान भावाचा भोसकून खून

अंकली : पुढारी वृत्तसेवा
किरकोळ कारणावरून दोघा भावांमध्ये झालेल्या वादावादीतून मोठ्या भावाने लहान भावाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गोकाक येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. मोठा भाऊ रमजान देसाई (वय 26) याने किरकोळ वादातून लहान भाऊ मुनाफ देसाई (वय 24) याचा चाकूने भोसकून खून केला. लहान बंधू मुनाफ देसाई
हा आपल्या आई-वडिलांना रविवारी रात्री वाद घालत होता. यावेळी मोठा बंधू रमजान देसाई याने आई-वडिलांशी वाद घालू नकोस, असे सांगितले. त्यावेळी लहान भावाने त्याच्याशीही उलट वाद घातल्याने वाद विकोपाला गेला.

सदर वादातून मोठा बंधू रमजान देसाई याने लहान बंधू मुनाफ देसाई याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला. नातेवाईकांनी लहान भावाला गोकाकमधील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी गोकाक शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद गोकाक पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news