नाशिक : आंघोळीसाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाचा दारणा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

नाशिक : आंघोळीसाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाचा दारणा नदीत बुडून मृत्यू

नाशिक : आंघोळीसाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाचा दारणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.15) घडली. कुणाल प्रकाश यादव (26, रा. गवळीवाडा, देवळाली कॅम्प) असे या युवकाचे नाव आहे. कुणाल हा मित्रांसोबत दारणा नदीत आंघोळीसाठी गेला होता. मात्र, पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्यास मित्रांनी बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button