कर्नाटक : औषध विक्रेत्याचा पाठलाग करून खून

कर्नाटक : औषध विक्रेत्याचा पाठलाग करून खून
Published on
Updated on

संबरगी (कर्नाटक) :  पुढारी वृत्तसेवा
ऐनापूर- अथणी रस्त्यावर कात्राळजवळ पाठलाग करून औषध विके्रत्याचा खून करण्यात आला. चिंतामणी बंडगर (वय 26, रा. कात्राळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून सोमवारी (दि.2) रात्री ही घटना घडली. अज्ञातांनी दुचाकीवरून पाठलाग करत धारदार शस्त्राने भोसकून खून केला. घटनेची नोंद कागवाड पोलिस स्थानकात झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कात्राळ (ता. कागवाड) येथील रहिवासी चिंतामणी बंडगर याने दोन महिन्यांपासून ऐनापूर येथे औषध दुकान सुरू केले होते. सोमवारी रात्री दहा वाजता औषध दुकान बंद करून चिंतामणी दुचाकीने परतत होता. अज्ञातांनी त्याचा दुचाकीवरून पाठलाग करून धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. 3) सकाळी ही घटना निदर्शनास आली. त्याची माहिती मिळताच घटनास्थळी कागवाड पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रबकवी सहकार्‍यांसह दाखल झाले. चिंतामणी याचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

कागवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. घटनास्थळाची अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा यांनी पाहणी केली. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news