

चिकोडी: पुढारी वृत्तसेवा: काही दिवसांपूर्वी तालुक्यातील कब्बूर शहराबाहेरील बेलद बागेवाडी रस्त्याला लागून असलेल्या चिकोडी उपकालव्याच्या रस्त्याच्या शेजारी झालेल्या खून प्रकरणाचा छडा लागला आहे. याप्रकरणी दोघा संशयित आरोपींना चिकोडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी कब्बूर शहराबाहेरील बेलद बागेवाडी रस्त्याला लागून असलेल्या चिकोडी उपकालव्याच्या रस्त्याच्या शेजारी भीमन्ना मुनोळी (वय 51) या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. खून करून मृतदेह फेकल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी चिकोडी पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर त्या रात्री वासू अर्जुन माळींगे व सिद्धपा लगमपा माळींगे (दोघे रा. शिरहट्टी) हे रस्त्याच्या शेजारी दारू पीत बसले होते. याचवेळी याच गावचा रहिवासी मयत भीमना मुणोळी हा देखील दारूच्या नशेत जात असताना इथे कोण दारू पीत बसले आहात, असे विचारले. यावर तिघांच्यात शिवीगाळ झाली. यावर भीमना यांनी मी पोलिसांना सांगतो, असे सांगितले. यामुळे दोघा आरोपींनी मिळून भीमना याचा खून करून रस्त्याच्या शेजारी फेकून दिले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा