बेळगाव : उगार येथील महिलेच्या खून प्रकरणी चौघांना जन्मठेप | पुढारी

बेळगाव : उगार येथील महिलेच्या खून प्रकरणी चौघांना जन्मठेप

चिकोडी, पुढारी वृत्तसेवा :  उगार खुर्द (ता. कागवाड) शहरातील साई नगरमध्ये असलेल्या उगार शुगर कारखान्याच्या जागेत सद्दाम अमीन बागे याचे वास्तव्य होते. त्याने प्रेयसीसोबत लग्ण करण्यासाठी प्रेयसी व तिच्या कुटुंबियांच्या मदतीने स्वतःच्या २२ वर्षीय गरोदर असलेल्या दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी येथील ७ व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस. एल. चव्हाण यांनी चारही आरोपींना जन्मठेप व प्रत्त्येकी २० हजाराच्या दंडाची शिक्षा आज सुनावली. सरकारी वकील म्हणुन वाय. जी. तुंगळ यांनी काम पाहिले.

सुमय्या बागे (वय-२२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर सद्दाम अमीन बागे (रा. उगार खुर्द, ता. कागवाड), श्रीमती आफ्रिन सिराज नागनूरे, श्रीमती शैनाज सिराज नागनूरे, सुलतान सिराज नागनूरे (तिघेही रा. विनायकवाडी, ता. कागवाड) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नांवे आहेत. सरकारी वकील वाय. जी. तुंगळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कागवाड तालुक्यातील उगारखुर्द शहरातील साई नगरमध्ये असलेल्या उगार साखर कारखान्याच्या जागेमध्ये प्रमुख आरोपी सद्दाम अमीन बागे हा वास्तव्यास होता. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने ऐनापुर येथील युसुफ रसूलसाहेब मुल्ला यांची मुलगी सुमय्या हिच्याबरोबर एप्रिल २०२० महिन्यात विवाह केला होता. सद्दाम याचा आपल्या नातेवाईकातीलच एका घटस्फोटीत महिलेशी संबंध होता.

या संबंधात अडचण ठरत असलेल्या पत्नीचा त्याने प्रेयसी, तिचा भाऊ व तिची आई यांच्यासह मिळून १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११.३० वाजता खून केला. मृत झाल्यावेळी सुमय्या ही ५ महिन्याची गरोदर होती. तरीही दयामाया न करता केवळ प्रेयसी बरोबर विवाह करण्याच्या उद्देशातून चौघांनी तिला झोपलेल्या अवस्थेत हात पाय धरून तिच्या तोंडावर उशिने दाबून तिचा खून केला होता. याप्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

हेही वाचंलत का?

Back to top button