बेळगाव : सेवा बजावताना वीज पडून शिरूरच्या जवानाचा मृत्यू

बेळगाव : सेवा बजावताना वीज पडून शिरूरच्या जवानाचा मृत्यू

अंकली (जि. बेळगाव); पुढारी वृत्तसेवा : आसाम येथे सीमा सुरक्षा दलात सेवा बजावत असताना वीज पडून बागलकोट जिल्ह्यातील शिरूर येथील जवानाला वीरमरण आले. अशोक मुंदडा (वय 41) असे जवानाचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

अशोक हा बीएसएफ तेरा बटालियनमध्ये कार्यरत होता. आसाम-बंगाल सीमेवर शनिवारी रात्री सेवा बजावत असताना वीज पडून त्याला वीरमरण आले. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. उद्या सायंकाळपर्यंत पार्थिव येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशोकच्या मृत्यूने त्याचे जन्मगाव शिरूर गावावर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news