जपानच्या ८३ वर्षीय वयोवृद्धाने नावेतून पार केला प्रशांत महासागर | पुढारी

जपानच्या ८३ वर्षीय वयोवृद्धाने नावेतून पार केला प्रशांत महासागर

टोकिओ : वृत्तसंस्था
जपानच्या 83 वर्षीय केनिची होरी या वृद्धाने शनिवारी आपल्या नावे एक नवा विक्रम नोंदविला. प्रशांत महासागर एकट्याने आणि न थांबता आपल्या होडीने पूर्ण केला आहे.

होरी 27 मार्च रोजी सॅनफ्रॉन्स्किो येथून आपल्या 990 किलो वजन आणि 19 फूट लांबीच्या सनटोरी मरमेड थ्री या नावेतून प्रशांत महासागराच्या प्रवासाला निघाले. शनिवारी ते सलग प्रवास करून त्यांनी प्रशांत महासागर पार केला आणि शिकोकू बेटाहून वाकायामा येथे पोहचले. होरी यांनी 70 दिवसांत 4 हजार किलोमीटर अंतर पार केले. हा प्रवास माझ्यासाठी खूपच खडतर होता. माझे कुटुंबीय खूपच अस्वस्थ होते. त्यांनी माझी काळजी करू नये, यासाठी मी कुटुंबीयांशी सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून रोज संवाद साधत होतो, असे होरी सांगत आहेत. होरी आपल्या नावेतून एक मोबाईल अ‍ॅप आणि सॅटेलाईट प्रसारणाचा वापर करत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वेबसाईटवरून लोक पाहू शकत होते. दिवसांतून एखाद्यावेळी जरी मी फोन केला नाही तर माझे घरचे लोक खूपच काळजीत पडत असत. माझ्या कुटुंबाच्या पाठबळामुळेच मी प्रशांत महासागर पार करण्यात यशस्वी ठरलो. – केनिची होरी

Back to top button