Refrigerator Explodes : घरात फ्रिजचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, बेळगावातील घटना

या घटनेत फ्रिजचा स्फोट कोणत्‍या कारणाने झाला याचा पोलिस तपास करत आहेत.
Refrigerator explode
Refrigerator explode : घरात फ्रिजचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, बेळगावातील घटनाfile photo
Published on
Updated on

Refrigerator explodes at home; four members of the same family die; incident in Belagavi

पुढारी ऑनलाईन : बेळगाव येथे सोमवारी रात्री घरातील फ्रिजचा कथितरित्या स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. बेळगाव पोलिसांकडून फ्रिजचा स्फोट शॉर्ट सर्किटमुळे झाला की अन्य कोणत्या कारणाने लागलेल्या आगीमुळे झाला, याचा तपास केला जात आहे.

Refrigerator explode
Lalbaugcha Raja : ‘इथली ऊर्जा अद्भुत आहे...’, लालबागचा राजाच्या दर्शनानंतर अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांची प्रतिक्रिया

भारती डामोने (वय ५०), शारदा डामोने (४५), गंगा डामोने (२५) आणि प्रिया डामोने (२४) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गजानन डामोने (६५) आणि रोशन डामोने (२१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शारदा या गजानन यांच्या पत्नी होत्या, तर भारती डामोने या त्यांच्या बहिणी होत्या. प्रिया आणि गंगा या गजानन आणि शारदा यांच्या मुली होत्या, तर रोशन हा त्यांचा मुलगा होता.

बेळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डामोने कुटुंबाने गणेश चतुर्थी साजरी करण्याची तयारी केली होती. त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळील चव्हाट गल्ली येथील आपल्या घरात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले. नेहमीप्रमाणे ते फ्रिजजवळ झोपले होते.

रात्री सुमारे २.१५ वाजता रहिवाशांना मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी कुटुंबाच्या शेडकडे धाव घेतली असता तेथे आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी गजानन आणि रोशन यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, अन्य चौघांचा होरपळून मृत्यू झाला.

Refrigerator explode
Grah Gochar 2026 : दिवाळीपूर्वीच ६ राशींवर होणार धनवर्षाव! जुळून येणार दुर्मीळ योग

पोलिसांच्या माहितीनुसार, गजानन आणि रोशन यांना ६० टक्के भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. या शेडला काँक्रीटच्या भिंती नव्हत्या. स्फोटामुळे शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरातील बहुतांश मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या.

“प्राथमिकदृष्ट्या फ्रिजचा स्फोट झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा आम्ही तपास करत आहोत. शॉर्ट सर्किटमुळे किंवा अन्य कोणत्या आगीमुळे हा स्फोट झाला का, याची चौकशी सुरू आहे. गणेशमूर्तीला काही दिव्यांची सजावटही करण्यात आली होती. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. गजानन हे सुतारकामाचे काम करत होते, तर कुटुंबातील इतर सदस्य घरकाम तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news