

grah gochar diwali 2026 planetary transit shukra budh mangal lucky zodiacs money gain
पुढारी ऑनलाईन : Grah Gochar 2026 : दिवाळी २०२६ च्या अगदी आधी ग्रहांचे सेनापती मंगळ, धन आणि वैभवाचे दाते शुक्र आणि बुद्धीचे कारक बुध हे एकत्र येऊन दुर्मीळ त्रिग्रही गोचर तयार करणार आहेत. ज्योतिषांच्या मते, या दुर्मीळ संयोगामुळे काही राशींचा ‘गोल्डन टाइम’ सुरू होणार आहे.
Grah Gochar 2026: यंदा दिवाळीचा सण येण्यापूर्वीच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मीळ आणि शुभ संयोग तयार होणार आहे. ग्रहांच्या हालचालींमध्ये असा मोठा बदल होणार आहे की अनेक जातकांच्या बंद नशिबाची दारे अचानक उघडू शकतात. पंचांगानुसार, ग्रहांचे सेनापती मंगळ, धन आणि वैभवाचे दाते शुक्र आणि बुद्धी व व्यापाराचे कारक ग्रह बुध हे तिन्ही मोठे ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही गोचर आणि युतीचे चक्र तयार करणार आहेत. हा संयोग थेट धनवर्षावाचे संकेत देणारा मानला जात आहे.
दृक पंचांगानुसार, शुक्र स्वतःच्या राशीत म्हणजेच तूळ राशीत विराजमान राहून आपली स्थिती मजबूत करतील. तर बुध ७ सप्टेंबरला कन्या राशीत आणि त्यानंतर २६ सप्टेंबरला तूळ राशीत प्रवेश करून शुक्रासोबत ‘लक्ष्मी-नारायण राजयोग’ तयार करतील. याशिवाय, १८ सप्टेंबरला मंगळाचा कर्क राशीत प्रवेशही मोठा बदल घडवून आणणार आहे. प्रसिद्ध ज्योतिषांच्या मते, ग्रहांच्या या हालचालींचा सर्वाधिक आणि सकारात्मक परिणाम ६ प्रमुख राशींच्या जीवनावर पाहायला मिळू शकतो.
मेष राशी : आर्थिक प्रगती आणि प्रमोशनचे योग
मेष राशीच्या जातकांसाठी दिवाळीपूर्वीचा हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. ग्रहांच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. जे लोक बऱ्याच काळापासून करिअरमध्ये प्रमोशन किंवा पगारवाढीची वाट पाहत आहेत, त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक स्थैर्य आल्याने आत्मविश्वासही वाढेल.
कर्क राशी : जुन्या समस्यांचा अंत आणि अचानक लाभ
कर्क राशीच्या जातकांच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अडचणी आणि मानसिक तणाव आता दूर होण्याची शक्यता आहे. मंगळ आणि बुधाच्या हालचालींमुळे विविध मार्गांनी फायदा होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कन्या राशी : उत्पन्नाचे नवे स्रोत आणि नोकरीची संधी
कन्या राशीच्या लोकांसाठी हा गोचर करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा काळ ठरू शकतो. उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. घर-परिवारातील वातावरणही सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.
तूळ राशी : सुख-शांती, समृद्धी आणि नव्या संधी
तुमच्या राशीत शुक्राचे स्वराशीत असणे आणि त्याला बुधाची साथ मिळणे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येऊ शकते. तुमच्यात नवी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होईल. कौटुंबिक जीवनातील मतभेद दूर होऊ शकतात. तसेच, संततीशी संबंधित एखादा विषय अडकला असेल, तर त्याबाबत शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
धनु राशी : इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आणि अचानक फायदा
धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ नशिबाची दारे उघडणारा ठरू शकतो. फारशी धावपळ न करताही चांगल्या संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून अचानक मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जीवनात सर्व बाजूंनी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कुंभ राशी : ‘गोल्डन पीरियड’ची सुरुवात आणि नव्या ऑफर्स
ग्रहांचा हा महासंयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी ‘गोल्डन टाइम’ची सुरुवात घेऊन येऊ शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन भागीदारीसाठी आकर्षक ऑफर्स मिळू शकतात. भविष्यात या संधींमधून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.