File Photo
File Photo

बेळगाव : बेकिनकेरेत झाडावरील पाला काढताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू

Published on

बेकिनकेरे; पुढारी वृत्तसेवा :  बेकिनकेरे येथील रहिवासी भरमा सुभाना चिके (वय ५५) हे उचगाव मार्गावरील एका उंबराच्या झाडावर बकऱ्यासाठी पाला काढत होते. यावेळी जवळून गेलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसून झाडावरच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या घटनेनंतर हेस्कॉमचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावात धुलीवंदन सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

भरमा यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. हेस्कॉमने तातडीने चिके यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांचा वाद सुरू होता, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याशिवाय आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असे त्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितले.

          हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news