File Photo
File Photo

नाशिक : दिंडोरी नाका येथे धारधार शस्त्राने खून

Published on

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : पेठरोड परिसरातील शनि मंदिर येथील रहिवासी किरण गुंजाळ (वय २७) याची दिंडोरी रोडवरील स्वीट्स दुकानासमोर सायंकाळी भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. मयत व्यक्ती हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. सन २०१८ साली किरण गुंजाळ याच्या लहान भावाचा देखील खून करण्यात आला होता.

मृत किरण गुंजाळ हा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची विक्रीचा व्यवसाय करत होता. तर पेठ रोडवरील शनी मंदिर, नवनाथ नगर येथील रहिवासी असल्याची समजते. ३ ते ४ जणांनी हल्ला केल्याचे समजते. या हल्लेखोरांच्या मागावर पोलीसांनी जवळपास ५ ते ७ किमी पाठलाग केला असून परिसरातील सी सी टी व्ही तपासणीचे काम सुरू आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त डॉ किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ, अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मारेकऱ्यांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे समजते. पुढील तपास पंचवटी पोलिस करीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news