चिकोडी : यंदा पाऊस न झाल्यामुळे चिकोडी तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. सद्या केवळ 25 दिवस पाणी पुरवठा होईल, इतका साठा आहे. त्यानंतर चिकोडी शहराला पाण्याची समस्या भेडसावणार आहे. शहराची 50 हजार लोकसंख्या आहे. या शहराला तालुक्यातील कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. Chikodi News
यासाठी मांजरी व कल्लोळ पुलाजवळील जॅकवेलमधून पाणी उपसा करून केरूर क्रॉस येथे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून पाईपलाईनने चिकोडी येथील तीन पाण्याच्या टाक्यांमध्ये साठवले जाते. तेथून शहरातील विविध भागाना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापूर्वी शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविली आहे. Chikodi News
सद्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. यामुळे चिकोडी शहरासाठी पाणी उपसा होणाऱ्या मांजरी पुलानजीकच्या जॅकवेलनजीक पाणी कमी होत आहे. यामुळे शहराला दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. सद्या केवळ 25 दिवस पुरेल इतका पाणी साठा आहे. यामुळे कर्नाटकास महाराष्ट्र राज्यातील कोयना धरणातून पाणी सोडण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्र राज्याने पाणी न सोडल्यास कृष्णेची पाणी पातळी आणखी खालावणार आहे. यामुळे पाण्याची समस्या गंभीर होण्याची भिती आहे.
चिकोडी नगरपरिषदेकडून दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. आगामी काळात संभाव्य पाण्याची समस्या ओळखून नगरपरिषदेकडून नागरिकांना नळाचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी रिक्षा व भीतीपत्रकातून आवाहन केले जात आहे.
दुष्काळ परिस्थितीमुळे सद्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. यामुळे शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
- महातेश निडवणी, मुख्याधिकारी, चिकोडी नगरपरिषद
हेही वाचा