बेळगाव : बस-मोटारसायकलची धडक; तरुण जागीच ठार
बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा मांजरी तालुका चिकोडी येथील कृष्णा नदीच्या नव्या पुलाजवळ मोटारसायकल व राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या समोरा-समोर झालेल्या भीषण धडकेत मोटारसायकलस्वार तरुण जागीच ठार झाला. विलास अप्पासाहेब चिखले (वय 28 रा. शिरगुप्पी, ता. कागवाड ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विलास चिखले हा अंकली येथे काही कामानिमित्त जात होता. चिकोडीहून चंदुरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस मांजरी येथील कृष्णा नदीच्या नव्या पुलाजवळ आली असता मोटारसायकलस्वाराची बसला जोराची धडक बसली. या धडकेत विलास जागीच ठार झाला.
विलास बेळगाव येथील श्री माता को ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये पिग्मी संग्रहाचे काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. अंकली पोलिस स्थानकाचे फौजदार भरतगौडा यांनी घटनास्थळी पाहणी केली.
हेही वाचलंत का?
- IPL Prize 2022: आज विजेता संघ होणार मालामाल, जाणून घेऊयात स्पर्धेमधील विविध बक्षीसांची रक्कम
- पुणे : एका दिवसात 90 हजार सातबारा डाऊनलोडचा राज्यातील उच्चांक
- कोल्हापूर : शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? खा. राऊतांची फडणवीसांवर टीका
- Aadhaar Card : आधार कार्डच्या छायांकित प्रतीचा होऊ शकतो गैरवापर : केंद्र सरकारचा नागरिकांना इशारा

