बेळगाव : पिरनवाडीची ऐश्वर्या नेसरकरची ‘खेलो इंडिया युथ’ स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : पिरनवाडीची ऐश्वर्या नेसरकरची ‘खेलो इंडिया युथ’ स्पर्धेसाठी निवड
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी खेलो इंडिया ही स्पर्धा पंचकुला हरियाना येथील ताऊ देवी लाल स्टेडीयममध्ये दि. ५ ते १० जून या कालावधीत होत आहे. या स्पर्धेत पिरनवाडी गावची कन्या ऐश्वर्या हीरोजी नेसरकर ही तिहेरी उडी या खेळ प्रकारात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

बालिका आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या ऐश्वर्याने अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बक्षीस मिळवले आहे. सध्या ती एस.के.ई सोसायटीच्या जेएसएस महाविद्यालयात बी.सी.ए च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. ऐश्वर्या क्रीडा भारती (डायनामिक) क्लबमध्ये सराव करत असून महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एल. मजुकर व शारीरिक शिक्षण प्रमुख प्रशांत मनकले यांचे प्रोत्साहन, तर ॲथलॅटीक कोच अशोक शिंत्रे, उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news