जमखंडी; पुढारी वृत्तसेवा: जमखंडी विधानसभा मतदारसंघातून २०२३ च्या निवडणुकीत भाजपने जगदीश गुडगुंटी यांना उमेदवारी दिल्यास विजय निश्चित आहे, असा विश्वास अभिमानी संघटनेच्या सभेत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. येथील श्री नंदिकेश्वर देवालयात ही सभा आयोजित केली होती.
जमखंडी विधानसभा क्षेत्रात गेल्या दहा वर्षात असमर्थ उमेदवारी व पक्षातील बंडखोरी यामुळे भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत जगदीश गुडगुंटी यांना भाजपने उमेदवारी दिल्यास विजय निश्चित असल्याचे मत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अभिमानी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
देशाचा विकास, भारतीय संस्कृतीचे रक्षण करणारा भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे. जमखंडी मतदारसंघात ७० टक्के मतदार भाजपच्या विचाराचे आहेत. मला उमेदवारी दिल्यास विजयी निश्चित आहे. भाजपची उमेदवारी यावेळी आपल्यालाच मिळेल, असा विश्वासही जगदीश गुडगुंटी यांनी व्यक्त केला. या सभेत हनुमंत राय बिरादार, प्रकाश आरकेरी, शंकर हनगंडी आदींनी विचार व्यक्त केले.
यावेळी देवल देसाई, नागाप्पा सनदी, गुरुपाद मेंडीगेरी, सविता कल्यानी, आर. एस. अक्की, अशोक गावी, बसवराज मरनूर, जगदीश परोत बाडी, निंगाप्पा हेगडे, बसप्पा कोनाप्पणावर, बसवंत आप्पा, हनगडी, सदाशिव मांग आदी उपस्थित होते. उमेश आल मेलकर व पार्श्वनाथ उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. सदाशिव कवटगी यांनी स्वागत, तर बी. टी. कनाळ यांनी प्रास्ताविक केले.
हेही वाचलंत का ?