Richa- Ali Fazal चं ठरलं! १७५ वर्षांचे ज्वेलर घराणं डिझाईन करणार दागिने | पुढारी

Richa- Ali Fazal चं ठरलं! १७५ वर्षांचे ज्वेलर घराणं डिझाईन करणार दागिने

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिचा चढ्ढा-अली फजल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल (Richa- Ali Fazal ) यांचा विवाहसोहळा पुढील आठवड्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची तारीख ४ ऑक्टोबर ठरवण्यात आलीय. या समारंभासाठी तिची टीम सध्या तयारी करत आहे.  (Richa- Ali Fazal )

दिल्लीच्या समारंभासाठी, ऋचाचे दागिने बिकानेरमधील १७५ वर्षांपासून दागिने बनवत आलेले कुटूंब तयार करणार आहे. जे वधूचे दागिने बनवण्यासाठी ओळखले जातात. खजांची फॅमिली ज्वेलर्स हे एक प्रतिष्ठित कुटुंब आहे जे त्यांच्या हेरिटेज कारागिरीसाठी ओळखले जाते आणि ते रिचासाठी सिग्नेचर पीस डिझाईन करणार आहेत. खजिनदार घराणे मोती चंद खजांची यांचे वंशज आहेत. जे राजस्थानमधील सर्वात प्राचीन कला संग्राहकांपैकी एक होते आणि त्यांच्या दागिन्यांमध्ये बिकानेरच्या राजघराण्याचा समावेश होतो.

रिचा चढ्ढा आणि अली फझलसाठी लग्नाची तयारी करण्यात फार बिझी आहेत. अभिनेत्री रिचा नॉन-स्टॉप काम करत आहे.

रिचा आणि अली हे खूप दिवसांपासून डेटिंग करत आहेत. त्यांचे लग्न एप्रिल 2020 मध्ये होणार होते, परंतु कोविड प्रतिबंधांमुळे, लग्न दोनदा स्थगित करण्यात आले. या दोघांची पहिली भेट २०१२ मध्ये ‘फुक्रे’च्या सेटवर झाली होती. हे दोघे लवकरच ‘फुक्रे’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button