Belgaon Border controversy Black Day: 'सीमाप्रश्न लवकर सुटू दे, सीमाभाग महाराष्ट्रात सामील होऊ दे', उत्तराखंडमध्ये देवभूमीवर दुमदुमल्या 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा

Belgaum border controversy Black Day Uttarakhand : धामणे येथील युवकांनी चारधाम मंदिरात पाळला 'काळा दिन'
Uttarakhand
बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा उत्तराखंड चारधाम मध्ये देण्यात आल्या. यावेळी विजय बाळेकुंद्री, शिवाजी चौगुले, दशरथ बाळेकुंद्री, प्रकाश बाळेकुंद्री, लक्ष्मण बाळेकुंद्री, दीपक बाळेकुंद्री.Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांकडून दरवर्षी 'काळा दिन' पाळला जातो. सीमाप्रश्नाचा लढा केवळ बेळगावापुरता मर्यादित न राहता आता तो देशभरात पोहोचत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बेळगाव तालुक्यातील धामणे येथील मराठी भाषक युवकांनी थेट उत्तराखंड येथील पवित्र चार धाम मंदिरात १ नोव्हेंबर रोजी 'काळा दिन' पाळून आपला तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी उत्तराखंडमधील मंदिराच्या परिसरात "बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!" आणि "जय महाराष्ट्र" या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

उत्तराखंडच्या देवभूमीत श्री चार धाम दर्शन प्रसंगी धामणे येथील युवकांनी मंदिरात श्रींच्या चरणी साकडे घातले. "अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आमचा सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटू दे आणि सीमाभाग महाराष्ट्रात सामील होऊ दे," अशी प्रार्थना त्यांनी देवचरणी केली.

Uttarakhand
Police Inspector Arun Salunke funeral |उत्तराखंड हेलिकाप्टर अपघात: पोलिस निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

युवकांचा सहभाग

सीमा लढ्याची धग कायम ठेवत परराज्यातही भाषिक अस्मिता जपणाऱ्या या उपक्रमात धामणे येथील विजय बाळेकुंद्री, शिवाजी चौगुले, दशरथ बाळेकुंद्री, प्रकाश बाळेकुंद्रे, लक्ष्मण बाळेकुंद्री आणि दीपक बाळेकुंदे या युवकांनी सक्रिय सहभाग घेतला.सीमाभागातील अन्यायाविरुद्ध आणि आपल्या हक्काच्या लढ्यासाठी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी मराठी भाषक आपल्या भावनेशी ठाम आहेत, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Uttarakhand
Belgaum News : हुन्नुर येथे गुरू-शिष्य भेटीचा सोहळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.