Police Inspector Arun Salunke funeral |उत्तराखंड हेलिकाप्टर अपघात: पोलिस निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

Arun Salunke funeral Uttarakhand crash- बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अरटाळ गावात अंत्यसंस्कारासाठी तयारी
 Death  News
Death News Pudhari
Published on: 
Updated on: 

कर्नाटक : काशिनाथ सुळकुडे

चार दिवसापूर्वी उत्तराखंड येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात कर्नाटकातील पाच जणांसह सहा जण ठार झाले होते. यात माहित झालेल्या पोलिस निरीक्षक अधिकारी अरुण साळुंखे (वय 38) यांचे पार्थिव शरीर मुळगावी दाखल झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर मुळगावी असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील आरटाळ येथे अंत्यसंस्कार पार पडले जाणार आहे. गावात ग्रामस्थ, चाहते आणि हितचिंतक अरुण यांच्या पार्थिवास अंतिम श्रद्धांजली वाहत आहेत.

पोलीस अधिकारी अरुण हे शेतकरी कुटुंबातून आले होते. ते २००७ च्या बॅचचे कर्नाटक पोलिस अधिकारी होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीच्या गुप्तचर विभागात (इंटेलिजन्स विंग) इन्स्पेक्टर म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांची बेंगळुरूला बदली झाली आणि त्यांनी नेलमंगळ, कुणीगल, बाणसवाडी आदी पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली. सध्या ते बेंगळुरूच्या सीसीबी (CCB) विभागात कार्यरत होते.

 Death  News
Dr. B. R. Ambedkar : डॉ. आंबेडकरांनाही हवे होते बेळगाव महाराष्ट्रात

अरुण साळुंखे यांच्या निधनामुळे अरटाळ गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला तरुण मुलगा गेल्यामुळे आई-वडील आणि कुटुंबीयांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा आहे.

 Death  News
Belgaon Black Day: विजय देवणेंसह शिवसेनेच्या २५ कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.