बेळगाव : अ‍ॅड. कमल किशोर जोशी यांची ग्राहक न्यायालयात न्यायाधीशपदी निवड

बेळगाव : अ‍ॅड. कमल किशोर जोशी यांची ग्राहक न्यायालयात न्यायाधीशपदी निवड
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा  बेळगाव येथील ज्‍येष्‍ठ वकील कमल किशोर जोशी यांची जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. अ‍ॅड. कमल किशोर जोशी या पदाकरिता झालेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले हाेते. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, आणि कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव यांचा समावेश असलेल्या निवड समितीने घेतलेल्या मुलाखतीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.

ग्राहक न्यायालयाचे खंडपीठ अध्यक्ष, सदस्य व महिला सदस्य असे तीन सदस्यांचे आहे. या तीन पदांकरिता संपूर्ण कर्नाटक राज्यातील सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तसेच वरिष्ठ वकील अशा ६४५ उमेदवारांनी अर्ज केले होते.  त्यातून ऍड. कमल किशोर जोशी यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news