महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव येथे स्कॉर्पिओ अपघातात ९ जखमी | पुढारी

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव येथे स्कॉर्पिओ अपघातात ९ जखमी

महाड पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गावच्या हद्दीत अपघात झाला. आज पहाटे ५:४० वाजण्याच्या सुमारास एका वळणावर स्कॉर्पिओ वरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला २५ फूट खोल खड्यात पडली. या अपघातात ९ प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत हा अपघात झाला. अपघातात वैभव वसंत कदम वय २५ वर्षे , धीरज वसंत कदम वय २८ वर्ष , कविता धीरज कदम वय २६ वर्षे , विमल वसंत कदम वय ४५ वर्षे, सुनील भागवत कदम वय ३० वर्ष, योगिनी सुनील कदम वय ३६ वर्ष , विराज बाबू कदम वय १० वर्ष ,अन्वी सुनील कदम वय ४ वर्ष , ध्रुवी धीरज कदम वय ०२ वर्ष सर्व राहणार डोंबिवली असे ९ प्रवासी जखमी झाले.

सर्व जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती महामार्ग वाहतूक शाखा यांना मिळताच शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले यांनी घटना स्थळी धाव घेतली. सर्व जखमींना रुग्ण वाहिका द्वारे महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले . या अपघाताची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button