बेळगाव : ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अशोक साठे यांचे निधन

बेळगाव : ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अशोक साठे यांचे निधन

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : डॉक्टर, क्रिकेटपटू, टेनिसपटू, अभिनेते, गायक, दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे बेळगावचे ज्येष्ठ रंगकर्मी व बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. अशोक केशव साठे (वय 94) यांचे गुरुवारी (दि.20) पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे. बेळगावात संगीत नाटकांना ऊर्जितावस्था देण्याचे काम डॉ. साठे यांनी केले आहे. 2015 मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.

डॉ. साठे यांचे एमबीबीएस शिक्षण ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथे झाले. 1954 मध्ये डॉ. अशोक साठे यांनी बेळगावात प्रॅक्टिस सुरु केली. कडोलकर गल्ली व फुलबाग गल्लीतील त्यांच्या दवाखान्यात रुग्णांची मोठी गर्दी होत असे. वैद्यकीय सेवेतही त्यांनी पैसे मिळवण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपली. ते उत्कृष्ट टेनिसपटू होते. क्रिकेट, गोल्फ खेळातही ते पारंगत होते. अभिनय, गायन कलेचा वारसा त्यांना आईकडून मिळाला होता. सुमारे 150 संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत त्यांनी अभिनयासाठी तीन व दिग्दर्शनासाठी पाच पारितोषिके जिंकली होती. संगीत सौभद्र, संगीत संशयकल्लोळ, मानापमान, भ्रमाचा भापेळा, हाच मुलाचा बाप अशा नाटकात त्यांची भूमिका गाजली होती. ते युनियन जिमखानाचे माजी अध्यक्ष व बेळगाव क्लबचे व्यवस्थापकीय समिती सदस्य होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news