निपाणी शहराला वादळी पावसाचा तडाखा; इमारतींच्या छतांचे नुकसान; झाडे पडून वीजपुरवठा खंडित

निपाणी शहराला वादळी पावसाचा तडाखा
निपाणी शहराला वादळी पावसाचा तडाखा
Published on
Updated on

निपाणी ; राजेश शेडगे निपाणी शहरात काल (सोमवार) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने म्युनिसिपल हायस्कूल व विद्यामंदिर हायस्कूलच्या इमारतीवरील पत्रे व सांगाडा उडून पडला. यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. त्याचप्रमाणे बाबाजी लॉन मंगल कार्यालयाच्या डायनिंग हॉलवरील पत्रे उडून सी एम जोनी कंत्रा टदाराच्या घरावर जाऊन पडले. शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे व शेडचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

निपाणी शहरात पावसामुळे मोठे नुकसान…..

  • वादळी पावसामुळे म्‍युनिसिपल हायस्‍कूलच्या इमारतीवर पत्र्याचे नुकसान
  • बाबाजी लॉन मंगल कार्यालयाच्या हॉलवरील पत्र्यांचे नुकसान
  • शहरात मोठी झाडे कोसळली
  • विद्युत वाहिण्या तुटल्‍याने रात्रभर वीजपुरवठा खंडित
  • लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी
  • आमदार शशिकला जोल्लेंनी शासनाकडून भरपाई देण्याची दिली ग्‍वाही

    शहरातील मुख्यता भीम नगर परिसराला वादळी पावसाचा मोठा तडाका बसला असून, अंदाजे दोन कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. भीम नगर भागातील विद्या मंदिर या हायस्कूलचे इमारतीवरील भव्य लोखंडी शेड पत्र्यासह उपटून शेजारील सागर तेरणे यांच्यासह इतर घरांवर व वाहनांच्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील अनेक झाडे फांद्या तुटून रस्त्यावर, घरावर, वाहनांवर पडण्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये काल सायंकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्‍यामुळे संपूर्ण रात्र निपाणी अंधारात राहिली.

    दरम्यान या घटनेची पाहणी आमदार शशिकला जोल्ले, जयवंत भाटले, सुनील पाटील, सुरज खवरे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केली. माझी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार व नगरसेवकांनी स्वतंत्रपणे पाहणी केली. तहसीलदार एम एन बळीगार, पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, निपाणी तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी सुनील मद्दीन, हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुले यांनी ठिकठिकाणी पाहणी केली. नुकसानीचा सर्वे करून शासनाकडून भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली.

    निपाणी शहरात काल सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसापेक्षा वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत होते. या वाऱ्याने अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर विद्युत खांबावर घरावर वाहनांवर पडल्‍या. त्यामुळे वाहनांचे घरांचे विद्युत खांबांचे मोठे नुकसान झाले. येथील भीम नगर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील विद्या मंदीर हायस्कूल शाळेवर लोखंडी शेड होते. हे शेड पूर्णपणे उखडून बाजूंच्या घरावर अनेक वाहनांवर पडले. त्यामुळे घरांचे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बेळगाव नाका येथील बाबा लॉन या सभागृहावरील पत्रेही या वादळी वाऱ्यामुळे उडून पडले. तर निपाणी बस स्थानक परिसरातील अनेक झाडे फांद्या तुटून रस्त्यावर पडल्‍यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

    झाडांच्या फांद्या तुटून त्या विद्युत तारांवर पडल्‍यामुळे विद्युत तारा तुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. शहर व परिसरात 28 विजेचे खांब पडल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासून सर्व विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्‍यामुळे रात्रभर निपाणी अंधारात होती. सकाळी विभागाने सर्व भागात पाहणी केली असली तरी उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. या वादळी पावसामुळे निपाणी शहरात तब्‍बल दोन कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

    हेही वाचा : 

  • Lok Sabha Election 2024 | महायुतीच्या प्रचार गीतात मनोज जरांगेंची छबी, मराठा आरक्षण दिल्याचा उल्लेख
  • Delhi Bomb Threat : दिल्लीतील रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
  • 'इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी द्यावी', अमेरिकी खासदाराचे वक्तव्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news