पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील शाळांनंतर आता रुग्णालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याच्या धमक्या आल्या आहेत. चार रूग्णालयांना आज (दि.१४) ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. यापूर्वी दिल्लीतील शाळा, रुग्णालये, विमानतळ आणि उत्तर रेल्वेच्या सीपीआरओ इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.
अशोक विहारमधील दीपचंद बंधू हॉस्पिटलला आज सकाळी ९.४५ वाजता, डाबरी येथील दादा देव हॉस्पिटलला सकाळी १०.५५ वाजता, फरश बाजारातील हेडगेवार हॉस्पिटलला ११.१ वाजता आणि शाहदरा येथील जीटीबी हॉस्पिटलला सकाळी ११.१२ वाजता धमकीचा ई-मेल आला आहे. त्यानंतर पोलिसांची पथके हॉस्पिटलमध्ये रवाना झाली असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी दुपारी दिल्लीच्या २० हॉस्पिटल्स आणि उत्तर रेल्वेच्या IGI आणि CPRO कार्यालयात बॉम्बस्फोट करण्याचा ईमेल आला. संजय गांधी रुग्णालय आणि बुरारी सरकारी रुग्णालय प्रशासनाने ईमेल पाहून पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, ३ मे रोजी दिल्लीतील नांगलोई भागात बॉम्ब असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली होती. पोलीस मुख्यालयात ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. तपासानंतर पोलिसांनी हा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला. हा ईमेल एका अल्पवयीन व्यक्तीने पाठवला होता. पोलिसांनी त्याला पकडले होते.
हेही वाचा :