बरसल्या ‘श्रावणधारा’; बेळगावकरांची भरभरुन दाद | पुढारी

बरसल्या ‘श्रावणधारा’; बेळगावकरांची भरभरुन दाद

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित आणि मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ बेळगाव प्रस्तुत श्रावण मासात सुमधूर स्वरांची ‘श्रावणधारा’ मैफल बेळगावकर रसिक प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. शनिवारी (दि.२) मराठा मंदिरात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, सुप्रसिद्ध गायिका दीपाली देसाई यांनी जीवनगाणे वाद्यवृंदाच्या साथीने ‘श्रावणधारा’ या सुरेल मैफलीत अडीच तास रसिकप्रेक्षकांना सुमधूर गायकीने खिळवून ठेवले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या कार्यक्रमाला महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफपेढीच्या समूह सरव्यवस्थापिका शुभांगी कुलकर्णी प्रमुख उपस्थित होत्या.

बेळगाव ‘पुढारी’चे निवासी संपादक गोपाळ गावडा यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. मैफलीची सुरुवात दीपाली देसाई यांनी गायिलेल्या श्रावणात घन निळा बरसला या गीताने झाली. यानंतर एकापेक्षा एक गाजलेली गीते सादर करुन मंदार आपटे व दीपाली देसाई यांनी रसिकांची मने जिंकली. बासरी आणि ढोलकी वादनालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. खचाखच भरलेल्या सभागृहात वन्स मोअर आणि टाळ्यांचा कडकडाट लक्षवेधी ठरला.

हेही वाचा;

Back to top button