पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपटापासून ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे अभिनेता आर माधवन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. केंद्र सरकारने आर माधवन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आर माधवन यांना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. यानंतर आर माधवनचे चाहते खूश आहेत. यापूर्वी शेखर कपूर हे FTII चे अध्यक्ष होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी १ सप्टेंबर रोजी माहिती दिली आहे की, आर माधवन हे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष होणार आहेत. अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले की, 'एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर माधवन यांचे अभिनंदन केले.
यावेळी ते म्हणाले, मला खात्री आहे की तुमचा अफाट अनुभव या संस्थेला अधिक बळकट आणि समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला उच्च पातळीवर नेईल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तसेच आर माधवन यांचे अभिनंदन केले.
14 जुलै रोजी आर माधवन यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या डिनरला हजेरी लावली होती. त्याच वेळी, आर माधवनच्या 'रॉकेटरी : द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला नुकत्याच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे आर माधवनला सतत दुहेरी आनंद मिळत आहे. आर माधवनचे चाहते खूप खूश आहेत आणि त्याचे अभिनंदन करत आहेत.
.हेही वाचा