Dudhsagar Falls: दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी; पर्यटकांना काढाव्या लागल्या उठाबशा | पुढारी

Dudhsagar Falls: दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी; पर्यटकांना काढाव्या लागल्या उठाबशा

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा: मागील दोन दिवसांपासून कॅसलरॉक परिसरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे दूधसागर धबधबा (Dudhsagar Falls)  प्रवाहित झाला आहे. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने रविवारी (दि.१६) गर्दी केली. मात्र, या ठिकाणी बंदी असल्याने पोलिसांनी पर्यटकांना उठाबशा काढावयास लावत फटके दिले. त्यामुळे दुधसागर धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पोलिसांच्या कारवाईला समोरे जावे लागले.

यशवंतपूर वास्को रेल्वे धारवाडहून सकाळी 9.30 वाजता सुटते. ती कॅसलरॉकला रात्री 2 वाजता पोहोचते. तीच रेल्वे पुढे कुलेमला रात्री 3 वाजता पोहचते. या रेल्वेने पर्यटक मोठ्या संख्येने रविवारी दुधसागर  (Dudhsagar Falls) येथे दाखल झाले. कॅसलरॉकपासून 12 किलोमीटर व कुलेमपासून 3 किलोमीटर पर्यंत चालत पर्यटक दुधसागर धबधबा पाहण्यासाठी दाखल झाले. मात्र, या परिसरात रेल्वे खात्याकडून बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटकांना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा देऊन परत परत पाठवले. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.

हेही वाचा 

Back to top button