बेळगाव: पुढारी वृत्तसेवा : निखिल कत्तीच्या रूपाने हुक्केरी मतदारसंघाने तिसऱ्या पिढीला आमदारकी बहाल केली आहे. उमेश कत्ती यांनी हुकेरी मतदारसंघाचे सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे अकाली निधन झाल्याने या वेळेला भाजपने त्यांचे पुत्र निखिल कत्ती यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी या निवडणुकीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे तिसरी पिढीला आता मतदारसंघाने आमदारकी बहाल केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Karnataka Election Results 2023)
यापूर्वी उमेश कत्ती यांचे वडील विश्वनाथ कत्ती यांनी हक्केरी मतदारसंघातून विजयी मिळवला होता. निखिल यांच्या रुपाने आता तिसऱ्या पिढीकडे आमदारकी बहाल झाली आहे.
कर्नाटकात काँग्रेसने १२८ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर भाजप ६७ आणि जेडीएस २२ जागांवर आघाडीवर आहे. या निकालावर भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव मान्य केला आहे. त्यांनी या विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदनही केले आहे. "आम्ही बहुमताचा आकडा गाठू शकलो नाही. संपूर्ण निकाल आल्यानंतर आम्ही तपशीलवार त्याचे विश्लेषण करू. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही केवळ या निकालाचे विश्लेषणच करणार नाही तर विविध स्तरांवर आम्ही कुठे कमी पडलो हेदेखील पाहणार आहोत." असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. (Karnataka Election Results)
हेही वाचा