Karnataka election 2023 | कर्नाटकात भाजपला दुसरा मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश | पुढारी

Karnataka election 2023 | कर्नाटकात भाजपला दुसरा मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे सहा वेळचे आमदार जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजमधून बाहेर पडताच त्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे. रविवारी त्यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्त्व आणि विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने शेट्टर यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेट्टर नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Karnataka election 2023)

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, सिद्धारामय्या यांच्या उपस्थितीत शेट्टर यांचा बंगळूरमधील कार्यालयात पक्ष प्रवेश झाला. भाजपसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे.

याआधी शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी यांनी भाजपचे सदसत्व आणि विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शनिवारी लगेच काँग्रेसने त्यांना अथणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी जगदीश शेट्टर यांना लगेच ‘बी’ फॉर्मही दिला. दरम्यान, मी मनापासून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डीके शिवकुमार, सिद्धरामय्या, रणदीप सुरजेवाला आणि एमबी पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला ऑफर दिल्यावर मी कोणताही विचार न करता काँग्रेसमध्ये आलो, अशी प्रतिक्रिया जगदीश शेट्टर यांनी दिली आहे.

जगदीश शेट्टर यांना भाजपमध्ये जशी वागणूक मिळाली, तशी कोणालाही कोणत्याही पक्षात मिळाली नसेल. ते दुखावले गेले आहेत आणि त्यांच्या समाजाचा आणि समर्थकांचा भाजपने अनादर केला. जगदीश शेट्टर आमच्यासोबत आल्यानंतर आम्ही १५० हून अधिक जागा जिंकू. त्यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी दिली आहे.

लिंगायत समाज हा कर्नाटकातील मोठा समाज आहे. ते (भाजप) बीएस येडियुरप्पा यांना त्यांचे नेते मानतात आणि जगदीश शेट्टर नेहमी दुसऱ्या स्थानी होते. भाजपने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून खाली आणून त्यांचा अनादर केला. म्हणूनच राजीनामा देताना ते रडले होते, असे सिद्धारामय्या यांनी म्हटले आहे.

चार दिवसांपूर्वी भाजपची पहिली यादी जाहीर होताच त्यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. शेट्टर हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना त्यानंतर दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. तिथे त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मात्र नड्डा यांनी त्यांना नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी निवडणुकीतून बाजूला होण्याची विनंती केली. त्यामुळे दुखावलेल्या शेट्टर यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी भाजपने मला राजकारणातून बाजूला होण्याची विनंती केली असती, तर तर मी तेव्हाच बाजूला झालो असतो. मात्र निवडणुकीची घोषणा होईपर्यंत मला काहीच सांगण्यात आलेले नव्हते आणि आता अचानक बाजूला होण्यास सांगण्यात आले. उत्तर कर्नाटकात आम्ही वाढवलेल्या पक्षाकडून मलाही अपेक्षा नव्हती. हा आमच्या मेहनतीचा अनादर आहे. तरीही पक्षाकडून आतापर्यंत मला जे काही मिळालं त्याबद्दल मी आभारी आहे.

शनिवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांनी शेट्टर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची पुन्हा समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शेट्टर यांनीही भाजपला शनिवार रात्रीपर्यंतची वेळ दिली होती. या वेळेपर्यंत आपली उमेदवारी जाहीर न केल्यास पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत भाजपकडून काहीच घोषणा न झाल्याने त्यानंतर पत्रकार परिषद बोलावून शेट्टर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती.

हे ही वाचा :

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?