बेळगाव : शोभा सोमनाचे यांना मिळाला भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान, तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड | पुढारी

बेळगाव : शोभा सोमनाचे यांना मिळाला भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान, तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; गेल्या सतरा महिन्यांपासून रखडलेल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या निवडणुकीत महापौरपदी शोभा सोमनाचे यांची बिनविरोध, तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली. म. ए. समितीच्या वैशाली भातकांडे यांनी निवडणूक लढवली तर काँग्रेस नगरसेवकांनी शपथ घेऊन निवडणुकीवर बहिष्कार घातला.

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून 58 पैकी 35 नगरसेवक भाजपचे आहेत. महापौर पद खुल्या वर्गातील नगरसेविकेसाठी राखीव असल्यामुळे उमेदवारीसाठी चुरस होती. अखेरपर्यंत शोभा सोमनाचे, सारिका पाटील आणि वाणी जोशी यांची नावे चर्चेत होती. दुपारी बारा वाजता भाजपच्या ठिकाणी समितीची बैठक हॉटेल संकम येथे पार पडली. त्यामध्ये शोभा सोमनाचे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. तर महापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. साडेबारा वाजता या दोघींची अर्ज दाखल करण्यात आले.

त्यानंतर सुकाणू समितीने भाजपकडून सोमनाचे महापौरपदासाठी आणि पाटील उपमहापौर उमेदवार आहेत असे सांगण्यात आले.
दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीत महापौर पदी शोभा सोमनाचे आणि उपमहापौरपदी रेश्मा पाटील बाजी मारली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेत आमदार अनिल बेनके, अभय पाटील, खासदार मंगल अंगडी, अण्णासाहेब जोल्ले यांनी सहभाग घेतला होता. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

महापौरपद खुल्या वर्गातील नगरसेविकेसाठी, तर उपमहापौरपद ओबीसी ब वर्गातील नगरसेविकेसाठी राखीव आहे. आज सोमवारी हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी दहापासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. महापालिका सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे.

हे ही वाचा :

Back to top button